मालवणी हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला दिल्लीतून अटक

मालवणी हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला दिल्लीतून अटक

मालाड मालवणीतल्या दारूकांडाचा प्रमुख आरोपी मन्सूर अली लतीफ शेख उर्फ आतीकला रात्री उशिरा विमानानं दिल्लीहून मुंबईला आणणण्यात आलंय. काल दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आतीकला दिल्लीत जेरबंद करण्यात आलं.

त्यानंतर दिल्लीतल्या कडकडडुमा न्यायालयातून मुंबई पोलिसांनी त्याच्यासाठी ट्रान्झिट रिमांड मागून घेतला. रात्री ११ वाजल्याच्या सुमारास जेट एअरवेजच्या विमानानं दिल्लीहून मुंबईला आणण्यात आलं.

रात्री दीडच्या सुमारास आतीकल मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या कार्यालयात आणून त्याची चौकशी सुरू करण्यात आलीय. आज आतीकची वैद्यकीय तपासणी करून त्याला किला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आतीकच्या पोलीस कोठडीसाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *