सरकारी कार्यालयात देवी- देवतांच्या छायाचित्रांना मनाई करणारे परिपत्रक अखेर मागे

सरकारी कार्यालयात देवी- देवतांच्या छायाचित्रांना मनाई करणारे परिपत्रक अखेर मागे

– सरकारी कार्यालयात देव देवतांचे फोटो यापुढे लावता येणार नाही हा राज्य सरकारने घेतलेला आदेश मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.
परिपत्रक मागे घेण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हा ‘ हा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला नसून तो ग्रामविकास खात्याने काढला आहे. या बाबतीत चौकशी करून या विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार येईल’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे देसाई यांनी सांगितले.
सरकारी कार्यालयात विविध धर्मांच्या देवांची प्रतीके, छायचित्र वा धार्मिक चिन्हे भिंतीवर लावण्यास मनाई करणारे परिपत्रक काढण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *