मुंबईचे डबेवाले करणार शिवसेनेचा प्रचार

‘शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकावेल’ असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकांसाठी भाजपासोबत युती न करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे शिवसैनिकांनी जल्लोष केला तर भाजपानेही स्वबळाचा नारा देत ‘जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत, त्यांच्याशिवाय परिवर्तन करू’ असे ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे आता महापालिकांचा ही निवडणूक चुरशीची झाली असून कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेआहे.
असे असतानाच मुंबईच्या डबेवाल्यांनी मात्र शिवसेनेच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला असून डबेवाले शिवसेनेचा प्रचारही करणार आहेत.  ‘ डबेवाल्यांची संघटना  म्हणजे १००% मराठी माणसांची संघटना आहे. यामध्ये एकही परप्रांतीय नाही. मुंबईवरही मराठी माणसांचेच प्रभुत्व असावे असे डबेवाल्याला वाटते’ असे मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. तसेच ‘ महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *