घृणास्पद – सामूहिक बलात्काराचं फेसबुक Live

एका तरूणीवर सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबुक लाईव्हवर दाखवल्याची घृणास्पद घटना स्वीडनमध्ये घडली आहे. या प्रकरणी तीन संशयित तरूणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्वीडनमधील उप्पसलामध्ये सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी उप्पसलामधील एका अपार्टमेंटधून तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तीन नराधमांनी तरूणीवर सामूहिक अत्याचार करतानाच त्याचे चित्रण केले आणि ६० हजार मेंबर्स असलेल्या एका क्लोज्ड ग्रुपवर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केले. हे पाहताच जोसेफाईन लँडग्रेन या २१ वर्षीय तरूणीने पोलिसांना फोन करून या धक्कादायक घटनेची माहिती दिली. त्या तीन नराधमांपैकी एक २४ वर्षीय तरूण हा याआधीही अनेक गुन्ह्यांत अडकला होता. जोसेफाईनने दिलेल्या माहितीनुसार, त्याने लाईव्ह स्ट्रीमिंग करताना प्रथम तिचे कपडे फाडले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्याने ही सर्व गटना कॅमे-यात कैद केली आणि त्याचे फोटोही काढले व ते स्नॅपचॅटवरही टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *