घरमालकाचा भाडेकरु महिलेवर चार वर्षे बलात्कार

पिंपरी चिंचवडमधील राहाटणीत एका भाडेकरु महिलेवर घरमालकाने वारंवार बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २८ वर्षीय पीडित महिलेने याबद्दलची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

पीडित महिला पतीसह राहाटणीत भाड्याने वास्तव्यास आहे. या घराचा मालक दत्तात्रय कुंठेकर (वय ५५) २०१२ ते २०१६ या कालावधीत पीडित महिलेवर बलात्कार करत होता. पती कामावर गेल्यानंतर दत्तात्रय कुंठकर घरात घुसून वारंवार बलात्कार करत असल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. याबद्दल कोणाला काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी घरमालकांनी दिली होती, अशी माहितीदेखील पीडितेने पोलिसांना दिली आहे. गेली चार वर्ष दत्तात्रय कुंठेकर पीडितेवर बलात्कार करायचा आणि त्याला विरोध केल्यास मारहाण करायचा. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता घोडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *