एक गाव दुधाविना चहा पिणारं. कारण गावात दुधाची दहशत आहे…. औरंगाबादमधलं धानोरा गाव… का आहे या गावात दुधाची दहशत… पाहूयात दुधाच्या दहशतीची ही कहाणी….
अंजली काकडे सध्या दुधाविनाच चहा पितायत. दुधाचा चहा प्यायची त्यांना भीती वाटतेय. धानोरा गावातल्या दुधाची भीती वाटणा-या एकट्या अंजली नाहीत. अख्या गावालाच दुधाची आता भीती वाटतेय. दोन दिवसांपूर्वी अंजली काकडे यांच्या गायीचा मृत्यू झाला. या गायीला पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्यामुळे इन्फेक्शन होऊन गायीचा मृत्यु झाला. पाठोपाठ दुस-या गायीचाही मृत्यू झाला. दुस-या गायीच्या मृत्यूनं ग्रामस्थ घाबरले. कारण याच गायीच्या दुधाचा चहा पिऊन ग्रामस्थांना मळमळ उलट्यांचा त्रास झाला… शंभरहून अधिक लोकांना विषबाधा झाल्याची बातमी हाहा म्हणता पसरली. सर्वांवर उपचार सुरू झाले आणि आता गावात दुध औषधालाही वापरलं जात नाहीये.
धानोरा म्हटलं की दुधासाठी प्रसिद्ध गाव. गावात 3 डेअरी आहेत. रोज हजार लीटरहून अधिक दुध सिल्लोडला जातं. पण दोन दिवसांत हा व्यवसाय पुरता रसातऴाला गेला.