भरवर्गात शिक्षक पुढाऱ्याने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

अलिबाग तालुक्‍यातील चौल येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी भरवर्गात अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरूद्ध रेवदंडा पोलीस ठाण्‍यात गुरूवारी रात्री उशिरा गुन्‍हा दाखल झाला आहे. अनिल पाटील असे या शिक्षकाचे नाव असून ते सध्या पसार झाले आहेत.
अनिल पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते असून अलिबाग तालु‍का पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्‍य आहे. अकरावीत शिकणारी ही पीडित विद्यार्थिनी परीक्षेचा पेपर लिहित असताना शिक्षक अनिल पाटील यांनी तिच्‍या बाकाजवळ जावून तिच्‍याशी अश्‍लील चाळे करण्‍यास सुरूवात केली. या वेळी पीडित विद्यार्थिनीने दुसऱ्या शिक्षकांकडे तक्रार केली तेव्‍हा पाटील यांना त्या वर्गातून बदलण्‍यात आले. हा प्रकार मुलीने आपल्‍या पालकांना सांगितल्‍यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्‍यात रात्री उशिरा गुन्‍हा दाखल केला. शिक्षक पुढाऱ्याकडून झालेल्‍या या कृत्‍याबददल परिसरात संताप व्‍यक्‍त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *