पोपटांच्या प्रेमापोटी कान कापले

पोपटांच्या प्रेमापोटी कान कापले

हे आहेत इंग्लंडमधील टेड रिचर्डस (५८). पोपटांचा यांना प्रचंड लळा. याच पोपटांच्या प्रेमापोटी त्यांनी चक्क दोन्ही कानच कापून टाकले आहेत. होय, आणि यासाठी खास शस्त्रक्रिया केली आहे.

ही शस्त्रक्रिया तब्बल सहा तास चालली. आपल्या पोपटांवर त्यांचे एवढे प्रेम की, त्यांच्यासारखे दिसण्यासाठी त्यांनी कान कापण्याचा निर्णय घेतला. आपल्या चेहऱ्यावर त्यांनी ११० टॅटू बनविले आहेत. त्यामुळे ते अगदी पोपटासारखे दिसत आहेत. एवढ्यावरच थांबतील ते रिचर्डस कसले? आता तर आपले नाकही पोपटासारखे करण्यासाठी ते एका चांगल्या सर्जनच्या शोधात आहेत. टेड यांचे कर्तृत्व असे आहे की, आता नाक कापूनही ते आपली मान उंचावणार आहेत. या पोपटांना आपण आपल्या मुलांसारखे मानतो, असे ते म्हणतात. टेड रिचर्डस यांच्या कानाची शस्त्रक्रिया तशी अवघड होती. कदाचित जिवावर बेतणारीही होती. पण, आपल्या प्रिय पोपटांसाठी ते काहीही करायला तयार आहेत.

>110 टॅटू काढले चेहऱ्यावर

>06 तासांची कानांवरील शस्त्रक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *