गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने ६० विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. सीएसटी-मडगाव-सीएसटी अशा या गाड्या धावणार असून, त्या गुरुवार वगळता सहाही दिवस असतील.
१००१/०१००२ सीएसटी-मडगाव-सीएसटी गाडी सीएसटीहून ११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत धावेल. सीएसटीहून रा. १२.२० वा. सुटून मडगाव येथे दु. २.१० वा. पोहोचेल.
१०३३/०१०३४ सीएसटी-मडगाव-सीएसटी साप्ताहिक विशेष गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी १० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर कालावधीत सीएसटीहून रा. १२.२० वा. सुटून त्याच दिवशी मडगाव येथे दु. २.१० वा. पोहोचेल. गाडी क्र. ०१०३४ ही मडगाव येथून दर गुरुवारी १० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर कालावधीत सुटेल. सीएसटीहून दु. ३.२५ वा. सुटून सीएसटी येथे पहाटे ४.२५ वा. पोहेचेल.
दादर-सावंतवाडी-दादर त्रैसाप्ताहिक विशेष गाडीच्या १८ फेऱ्या होतील. ०१०९५/९६ ही गाडी ११ ते २९ सप्टेंबर कालावधीत दर रविवार, मंगळवार, शुक्रवारी स. ७.५० वा. दादरहून सुटून सावंतवाडी येथे त्याच दिवशी रा. ८.३० वा. पोहोचेल. गाडी क्र. ०१०९६ ही गाडी १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर कालावधीत धावेल. ही गाडी सावंतवाडीहून दर सोमवार, बुधवार, शनिवारी पहाटे ४.५० वा. सुटून दु. ३.३० वा. दादरला पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलेवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरे, परेनेम, थिवीम, करमाळी थांबे आहेत.

