ठाणेकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी…

ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा उद्या म्हणजेच बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

24 तासांच्या या कालावधीत ठाण्यासह मुंब्रा आणि कळव्यातल्या काही भागातला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुख्य जलवाहिनीचं दुरुस्तीकाम हाती घेण्यात येत आहे.

त्यासाठी या भागांतला पाणी पुरवठा 24 तास बंद असणार आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन, ठाणे महापालिकेनं केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *