येथील निर्वासितांच्या कॅम्पवर लष्कराने चुकून विमानातून बॉम्ब टाकला. या घटनेत 100 हून अधिक निर्वासितांचा मृत्यू झाला आहे.
नायजेरिया स्टेटच्या अधिकृत माहितीनुसार, नायजेरियात निर्वासितांसाठी बांधण्यात आलेल्या कॅम्पवर येथील लष्कराच्या विमानातून चुकीने बॉम्ब फेकण्यात आला. यामुळे या कॅम्पमधील 100 हून अधिक निर्वासितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये शेकडोहून अधिक लोक वास्तव्यास होते.
दरम्यान, येथील बोको हराम या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्यासाठी लष्कराने मोहिम सुरु केली आहे.