कोयना परिसरात दुसरे महाबळेश्वर

राज्यातील भूकंपप्रवण परिसर अशी ओळख असलेले कोयना धरण व नदी परिसरात अनेक निसर्ग सौंदर्यस्थळांची मुक्त उधळण आहे. त्यापैकी काही स्थळांचा पर्यटनासाठी उपयोग व्हावा, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाने ‘दुसरे महाबळेश्वर’ या नावाने नवीन पर्यटन स्थळ विकसित केल्याची माहिती महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे यांनी दिली.

सह्याद्री डोंगररांगांत कोयना नदीच्या कुशीत अनेक निसर्ग सौंदर्यस्थळे आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ही सौंदर्यस्थळे कायम दुर्लक्षित राहिली. राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे या पर्यटन स्थळांना चालना दिली जात आहे. यंदाचे वर्ष हे पर्यटन वर्ष असल्याने सुरक्षित स्थळांमध्ये दुसरे महाबळेश्वर म्हणून विकास करण्यात आला आहे. पर्यटन उद्योग व स्थानिकांना रोजगाराच्या दृष्टीने यानिमित्ताने संधी उपलब्ध होणार आहे.

१३ नोव्हेंबर रोजी कोयना दर्शन महामहोत्सव होणार असून त्याला प्रमुख प्राहुणे म्हणून क्रिकेटपटू किरण मोरे, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अंजिक्य देव, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, सचिन लिमये, अदिती भागवत, सचिन लिमये प्रस्तुत कोयना नदीची महाआरती करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *