मुंबईत सहा मार्चला निघणार मराठा मोर्चा

मुंबईत मराठा मोर्चाच्या तारखेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यावर आता पडदा पडलाय. 6 मार्च ही तारीख मोर्चासाठी निश्चित करण्यात आलीय. यावेळी राज्यपालांना राज्यस्तरीय मागण्याचं निवेदन सादर करण्यात येईल तसंच सरकारचा निषेध करत कारवाईची मागणी करण्यात येईल, असं बैठकीला आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय.

मुंबईतल्या मोर्चानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाची पुढली दिशा त्यानंतर होणाऱ्या बैठकीत निश्चित होईल, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.  यापूर्वी 31 जानेवारीला मुंबईत मराठा मोर्चा निघेल असं सांगण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *