पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल 0.42 पैशांनी तर डिझेल 1.03 रुपयांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

याआधी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 जानेवारीला पेट्रोल 1 रूपया 29 पैशांनी महागलं तर डिझेल 97 पैशांनी महागलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदलेला दरांचा आणि रुपया-डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेत हे दर निश्चित केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *