निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद

राज्यात थंडीचा कडका आज आणखी वाढलाय. निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय.

निफाडला काल रात्री तापमान 4 अंशांपर्यंत खाली आलं. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या सर्वच भागात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार थंड़ी पडतेय.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कमालीची थंडी आहे. राज्यातील इतर भागांतही थंडीचा जोर चांगलाच वाढलाय. गेल्या आठवड्याभरापासून थंडीचा पारा सातत्याने घसरतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *