मी ट्रेलर नव्हे, तर पिक्चर दाखवतो. शिवसेना, भाजपाकडे पैसे आहेत माझ्याकडे नाहीत. दुस-या पक्ष पैशांच्या जोरावर लोक माणसे विकत घेत आहेत, असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर केला आहे. मुंबई मनपात सर्व जागा लढवणार असल्याचंही राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. नाशिक महापालिकेचं कर्ज फेडून मी कामे करून दाखवली आहेत. नाशिकसारखं केलेले काम इतर शहरात दाखवा. अजूनही बरीच माणसे माझ्यासोबत विश्वासाने आहेत. मी परत 60 नगरसेवक निवडून आणेन, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते. सेना आणि भाजपानं 30 वर्षं सत्ता उपभोगली आहे. मनसेच्या चांगल्या कामावर कोणीच बोलत नाही.
