धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने महिला जखमी

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अद्यापही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. मुंबईत लाखो चाकरमान्य रेल्वेने प्रवास करतात, वाहतूक आणि दळवळणाच्या प्रमुख साधनांपैकी एक असलेली, मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणा-या रेल्वेचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्याची किती आश्वासने दिली गेली, मात्र ते दावे फोल ठरतानाच दिसत आहेत. त्याचंच एक उदाहरण म्हणजे धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने होणारे अपघात. असाच एक अपघात काल रात्री पश्चिम रेल्वेच्या एलफिस्टन स्थानकाजवळ घडला. स्थानकावरून गाडी सुटताच अज्ञात व्यक्तीने लोकलवर दगड भिरकावला व तो लागून एक महिला जखमी झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. प्रचंड गर्दीमुळे दारात लोंबकाळावे लागलेल्या महिलेला तो दगड लागला आणि ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारांसाठी सायनमधल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *