जम्मू काश्मीरात चकमक, 1 दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दोन दहशतवादी हरितर तारजू परिसरात लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर सर्च ऑपरेशनदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. लष्कराच्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला असून दुस-याचा शोध घेतला जात आहे. ठार करण्यात आलेल्या जवानाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. चकमक अद्यापही सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *