प्रवेश नाकारणाऱ्या शिक्षकावर कारवाईचे आदेश
दहावीत शिकणाऱ्या मुलीवर लंगिक अत्याचार झाल्यानंतर आश्रमशाळेने पीडित मुलीला शाळेत प्रवेश बंद करून तिच्या अशिक्षित आईचा अंगठा घेऊन तिचा शाळेतून दाखला काढून टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुलीने आपल्यामुळे शाळेची बदनामी होत असेल, तर सरकारने आपल्याला आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्जच तहसीलदारांकडे दाखल केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. समाजकल्याण सहायक आयुक्त, उपजिल्हाधिकारी यांनी शाळेत जाऊन पीडित मुलीला सर्वसामान्यपणे बसू देण्याचे सांगून तिला प्रवेश नाकारणाऱ्या वर्गशिक्षकावर कारवाई करण्याचे आदेश बजावले आहेत.
शिकण्याची इच्छा असतानाही केवळ अत्याचाराला बळी पडल्यामुळे आपल्याला शाळेत इतर मुलींपासून बाजूला बसवून तुच्छतेची वागणूक मिळत असल्याने हैराण झालेल्या पीडित मुलीने आपल्याला शिकण्याची इच्छा आहे. मात्र शाळेत येऊ दिले जात नाही. त्यामुळे आत्महत्येची परवानगी द्यावी असा लेखी अर्जच तालुका तहसीलदारांकडे दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ शाळेला भेट दिली. पीडित मुलीला शाळेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या वर्गशिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश बजावले आहेत.
झाले काय?
बीड जिल्ह्यतील िशपेटाकळी येथील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर लंगिक अत्याचार झाल्यानंतर या पीडित मुलीला रामनगर येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील वर्गशिक्षकाने सुरुवातीला इतर मुलींपासून बाजूला बसवून आणि नंतर तिच्या अशिक्षित आईचा अंगठा घेऊन मुलीला शाळेतून काढण्याचाच प्रयत्न केला.