कार्ल्यात एकविरा देवी मंदिराजवळ दरड कोसळली

कार्ल्यात एकविरा देवी मंदिराजवळ दरड कोसळली

लोणावळा शहर आणि परिसरात काल पासून जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळं काल मध्यरात्री कार्ला इथल्या एकविरा देवी मंदिराजवळ वरील डोंगरावरून काही मोठ्या दरडी कोसळल्या आहे.

या दरडीमुळे एकविरा विश्वस्त मंडळाचं ऑफिस पूर्णपणे जामिनदोस्त झालं असून दर्शन रांगाच्या काही भागाचं नुकसान झालंय. ज्या ठिकाणी ही दरड कोसळली तिथं नेहमीच भविकांची तसंच कार्ला लेणी बघायला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी असते. मात्र सुदैवानं मध्यरात्री ही घटना घडल्यानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

मात्र वरील बाजूनं अजूनही काही दगड कोसळण्याचा धोका असून प्रशासनानं या ठिकाणी त्वरित काही उपाय योजना करणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *