पुण्यातील कार्पेट गोदामाला भीषण आग

पुण्यातील बिबवेवाडीतील गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान सध्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

बिबवेवाडीतील आई माता मंदिराजवळ असणाऱ्या कार्पेट गोदामाला सकाळच्या सुमारास आग लागली आहे. कार्पेटचे गोदाम असल्याने ही आग लगेच पसरली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कार्पेटच्या गोदामाजवळ रहिवासी इमारती आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचे आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *