मुथूट फायनान्समधून 40 किलो सोनं चोरीला

मुथूट फायनान्सच्या हैदराबादमधील शाखेत चोरी झाली असून 40 किलो सोने चोरीला गेले आहे. बीरामगुडा परिसरात ही चोरी झाली आहे. 8 कोटी किंमतीचे 40 किलो सोने बंदुकीचा धाक दाखवत लूटण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच शस्त्रधारी चोर सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास शाखेत घुसले. त्यावेळी शाखेत कर्मचारी साफसफाईचं काम करत होता. चोरांनी कर्मचा-याला बंदुकीचा धाक दाखवत लॉकरची तोडफोड केली आणि सोनं घेऊन फरार झाले. चोरी करण्याआधी चोरांनी सर्व सीसीटीव्ही काढून ठेवले होते. तसंच हार्ड डिस्कची आपल्यासोब घेऊन गेले. पोलीस परिसरात असलेल्या इमारतींचं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *