विरारमध्ये ट्रकच्या अपघातात पाईप लाईन फुटली

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर ट्रक उलटल्यानं आज विरारला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलाय.

महिन्याभरात अपघातामुळे पाणीपुरवठा बंद राहण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पहाटे चारच्या सुमारास हा ट्रक पाईपलाईनवर उलटला.

त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आलीय. पण काम पूर्ण होण्यासाठी संध्यकाळ होणार आहे. त्यामुळे दिवसभरासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *