सगळीकडे नाताळची धूम सुरू असताना निसर्गाकडूनही शिमला आणि उत्तराखंडला बर्फवृष्टीच्या रुपात नाताळची अनोखी भेट मिळाली आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये या मोसमातल्या पहिल्या बर्फवृष्टीचा नजारा पाहायला मिळाला.
उत्तराखंडमधली या मोसमातली ही पहिलीच बर्फवृष्टी आहे. तिथल्या पर्यटकांनी याचा मनमुराद आनंद लुटला. यामुळे या परिसरात बर्फाची पांढरीशुभ्र चादर पांघरली गेल्याचं दिसून आलं. बर्फवृष्टीमुळे पाराही कमालीचा घसरला.