जेवणाच्या बिलाचे 400 रुपये न दिल्याने ग्राहकाची हत्या

जेवणाच्या बिलाचे 400 रुपये न दिल्याने ग्राहकाची हत्या

जेवणाचं बिल न दिल्यामुळे हॉटेलमालकाने ग्राहकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकच्या येवल्यामध्ये घडली आहे. हत्येप्रकरणी हॉटेलमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येवल्याच्या हॉटेल अर्पितामध्ये जेवण केल्यानंतर तिघांनी बिलाचे 400 रुपये चुकवण्यास टाळाटाळ केली. पैसे न देताच तिघेही निघून जात असल्याने चिडलेल्या हॉटेलमालकाने बाईकवर चारचाकी कार घातली.

या घटनेमध्ये एका ग्राहकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघं जण गंभीर जखमी आहेत. तिघेही जण औरंगाबादेतील वैजापूरचे रहिवासी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *