साहित्य : ५/६ मुठे(खेकड्यांचा एक प्रकार), २ कांदे, १२/१३ लसूण पाकळ्या, १ वाटी डाळीचं पीठ, मिरची, आलं, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, हिंग, मीठ, तेल.
पिठाची कृती : डाळीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, आलं- लसूण- मिरचीचा ठेचा, हळद, तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घट्ट पीठ भिजवा.
कृती : मुठे धुवून त्याचे दोन भाग करा. कवचामध्ये घट्ट भिजवलेलं पीठ भरा. त्याचा पेंदा आणि कवच एकत्र करून दोऱ्याने बांधा. तेल तापवून त्यात लसूण हिंगाची फोडणी करा. त्यात भरलेले मुठे घालून ते बुडतील इतकं पाणी घाला. मुठे शिजल्यावर वरून कोथिंबीर पेरा.

