गुहागरमध्ये जाळ्यात अडकला ‘उडणारा मासा’

मासेमारी करायला गेलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात चक्क उडणारा मासा अडकला आहे. शक्यतो हे फ्लाईंग फिश मच्छिमारांच्या जाळ्यात अडकत नाहीत. पण असगोली येथील मच्छिमारांना हे मासे सापडले आहेत.
असगोली येथील मच्छिमार पहाटे तीन वाजता मच्छिमारीसाठी गेले होते. यावेळी जाळ्यात सापडलेल्यांपैकी जिवंत मासे त्यांनी पाण्यात ठेवून दिले होते. रानवी ते असगोली या परिसरात समुद्रात मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात पंख असलेले दोन मासे सापडले. परतल्यावर त्यांनी माश्यांना पंख असल्याचं उपस्थित पर्यटकांनाही दाखवलं. त्यानंतर या माशांना पुन्हा पाण्यात सोडून जीवनदान देण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *