नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या जुन्या नोटा भरण्यासाठी बँकेत 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. बँकेत जुन्या नोटा भरण्याबाबत आणखी एक नवा नियम लागू करण्यात आल्यात.
500 आणि 1000च्या 5 हजारांहून जास्त नोटा भरण्यावर निर्बंध घालण्यात आलेत. आता जुन्या नोटांची पाच हजारांवरील रक्कम 30 डिसेंबरपर्यंत एकदाच जमा करता येणार आहे.
सरकारने 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केली होती.
