महाराष्ट्र केसरी विजय चौधरींना शासकीय सेवेत घेणार – मुख्यमंत्री

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.  विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी घोषणा केली. यावेळी विजय चौधरींचे अभिनंदन करण्यात आले.  विजय चौधरींना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली असून  कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींनी नोकरी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन दिले.

10 डिसेंबर रोजी जळगावचा विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरला. पुण्याच्या अभिजीत कटकेवर मात करत विजय चौधरीने तिस-यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. विजय चौधरीने 2-0 ने अभिजीत काटकेवर मात केली. विजय चौधरीआधी नरसिंग यादवने सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा भीमपराक्रम केला आहे. आता हा विक्रम विजय चौधरीच्या नावेही झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारही हा अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *