अॅक्सिस बँकेच्या दिल्लीतील शाखेत १२ बनावट खाते

अॅक्सिस बँकेच्या दिल्लीतील शाखेत १२ बनावट खाते

अॅक्सिस बँकेसमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. नोएडा येथील एका शाखेत प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीतील एका शाखेत बनावट खाते असल्याचे समोर आले आहे.  दिलेल्या वृत्तानुसार प्राप्तिकर विभागाला दिल्लीच्या कृष्णानगर शाखेत १२ बनावट खात्यांची माहिती मिळाली होती. अद्याप विस्तृत माहिती मिळू शकलेली नाही.

गुरूवारी अॅक्सिस बँकेच्या नोएडा येथील ५१ सेक्टर येथील एका शाखेत प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. येथे २० बनावट कंपनीच्या खात्यामध्ये ६० कोटी रूपये जमा करण्यात आल्याचे समोर आले होते.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर पैसे देवाणघेवाणीत अनियमतता दिसून आल्यामुळे अॅक्सिस बँकेने संशयावरून आपल्या २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर बँकेने ५० खाते सील केले आहेत. तपास संस्थांनी दिलेल्या सूचननेनुसारच बँकेने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. नकारात्मक प्रचारामुळे ब्रँडवर अनुचित परिणाम होत असल्याचे बँकेने म्हटले आहे. परंतु हे सर्व तत्कालिक असेल अशी पुस्तीही बँकेने जोडली आहे.
तपास यंत्रणांनी बँकेच्या आठ शाखांची तपासणी केली असून यातील पाच शाखा या नवी दिल्लीतील असल्याची माहिती अॅक्सिस बँकेचे राजीव आनंद यांनी दिली. अॅक्सिस बँकेवर संशयाची सुई नसून बँकेशी व्यवहार करणाऱ्या व्यक्ती या तपासाच्या फेऱ्यात असल्याचे आनंद यांनी आवर्जून सांगितले. बँकेची कोणतीही शाखा बंद करण्याची कोणतीही सूचना नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *