एटीएममध्ये झेरॉक्स नोट आली कुठून?

चक्क एटीएममधून दोन हजारांची बनावट नोट   निघाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला.

नागपूर-वर्धा महामार्गावरील बुटीबोरी गावातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये सुभाष ठाकरे, परमेश्वर बागडे यांनी पैसे काढले.

सुभाष ठाकरे यांनी एटीएममधून काढलेली 2 हजाराची नोट वाईन शॉपमध्ये वाईन खरेदीसाठी नेली. त्यावेळी वाईन शॉप मालकाने ही नोट बनावट असल्याचे सांगितले.

याबाबत सुभाष ठाकरे यांनी या घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना दिली. बुटीबोरी पोलिसांनी बनावट नोट ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशीत ही नोट झेरॉक्स कॉपी असल्याचे निदर्शनास आले.. यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन बँकेला याबाबत माहिती दिली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *