अहमदनगर येथे गांजाची तस्करी उघडकीस, ३३ लाखांचा ऐवज जप्त

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे २६० किलो गांजा मिळून आला आहे. पोलिसांनी टेम्पोसह सुमारे ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना गुरूवारी रात्री एक वाजता घडली. टेम्पोतून नाशिककडे गांजा नेला जात असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. रात्री तपासणीदरम्यान पोलिसांना टेम्पोत हा गांजा आढळून आला.
हा गांजा विशाखापट्टणम येथून नाशिककडे नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. टेम्पोत संशय येऊ नये म्हणून विशिष्ट रचना करून गांजा ठेवण्यात आला होता. शिर्डीत राजपूत नावाच्या व्यक्तीकडे हा गांजा पोहोचवण्यात येणार होता असे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले. २६० किलो गांजाची किंमत सुमारे २६ लाख इतकी होते. पोलीस चालकाची कसून चौकशी करत असून यापूर्वीही असे प्रकार करण्यात येत होते का याचा शोध घेण्यात येत आहे. चौकशीतून गांजाची तस्करी करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *