बेताची आर्थिक आणि मुलाच्या आजाराला कंटाळून एका १० ते ११ वर्षांच्या मुलाला अनाथ सोडून देत असल्याची चिठ्ठी आणि ३०० रु पये देऊन एक गृहस्थ सोडून गेल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना अलिबाग येथे घडली.
शहरातील जोगळेकर नाका येथे संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालक अनंत शेलार
यांच्या रिक्षात १० ते ११ वर्षांच्या मुलासह एक ४५ ते ५० वयाचे
गृहस्थ येऊन बसले. त्यांनी रिक्षाचालकास अलिबाग समुद्रचौपाटीवर सोडण्यास सांगितले. तेथे पोहोचल्यावर त्या गृहस्थांनी, ‘‘मुलाला रिक्षातच बसू द्या, मी आमच्या बरोबरचे दोघे समुद्रावर आहेत त्यांना घेऊन येतो,’’ असे शेलार यांना सांगितले.
एक तास झाला तरी ते गृहस्थ वा अन्य कोणीही रिक्षाकडे परत आले नाही. त्यांनी रिक्षात बसलेल्या मुलाला याबाबत विचारले असता, तो मुलगा काही बोलत नव्हता. केवळ मान हलवून हो किंवा नाही, असे उत्तर देत होता. त्यावर शेलार यांनी हा मुलगा मुका असावा आणि काहीसा मानसिक रुग्ण असावा, असा अंदाज बांधला. त्यांनी त्या मुलाला अलिबाग पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे व महिला पोलीस यांनी त्या मुलाबरोबर खाणाखुणा करून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावरून तो मुका असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या खिशात त्याची ओळख सांगणारे काही आहे का हे पाहण्याच्या
हेतूने खिसे तपासले असता,
३०० रुपये आणि एक चिठ्ठी सापडली.याबाबत पोलिसांच्या
हाती काहीही लागले नाही. त्यामुळे फोटो काढून आम्ही तत्काळ अलिबाग परिसरालगतच्या सर्व पोलीस ठाण्यात त्याचे फोटो पाठवले आहेत.
