नोटाबंदी निर्णयानंतर करण्यात आलेली टोलवसुली पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राज्यासह देशभरात टोलवसुली सुरु झाली असून इतके दिवस ओस पडलेल्या टोलनाक्यांवर पुन्हा एकदा वाहनांच्या लांब रांगा लागताना दिसत आहेत. नोटाबंदीनंतर चलनाचा होणारा तुटवडा आणि सुट्ट्या पैशांची मारामारी यामुळे सरकारने टोलबंदीची घोषणा केली होती. 2 डिसेंबपर्यंतची ही मुदत मध्यरात्री संपल्यानंतर टोलवसुलीला पुन्हा सुरुवात झाली आहे.
टोलनाक्यांवर जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार नसून फक्त नवीन नोटाच चालणार आहे. पण टोलची किंमत 200 रुपयांहून जास्त असेल तर 500 ची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पण टोल 200 रुपयांपेक्षा कमी असल्यास सुट्टेच पैसे द्यावे लागणार आहेत. टोलनाक्यावर जुनी नोट फक्त 15 डिसेंबरपर्यंत वापरता येणार आहे.
जुनी नोट कुठे चालणार, कुठे नाही –
पेट्रोलपंपावरही जुन्या नोटा स्वीकारणं बंद करण्यात आलं आहे. फक्त नवीन नोटा स्वीकारण्यात येणार
विमान तिकीटासाठी जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत
रुग्णालयात 15 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरु शकतो
रेल्वे, एसटी तिकीट तसंच सरकारी कार्यालयात जुन्या नोटा वापरु शकतो
