तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका स्फोटके बनवण्याच्या फॅक्टरीत गुरुवारी सकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात १० जण ठार झाल्याची भिती आहे. दोन मृतदेह सापडल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
सकाळी पावणेआठच्या सुमारास स्फोट झाला. त्यावेळी फॅक्टरीमध्ये १६ मजूर होते. आगीवर आता नियंत्रण मिळवले असून फायरब्रिगेडच्या तीन गाडया घटनास्थळी आहेत. आग नेमकी कशामुळे लागली ते स्पष्ट झालेले नाही. स्फोटामुळे फॅक्टरीची इमारत पूर्णपणे कोसळली.
