कोलंबियातील मीडीलीन शहरात एक प्रवासी विमानाला अपघात झाला आहे. या विमानात एकूण ७२ प्रवासी होते. ब्राझीलच्या एका क्लबमधील फुटबॉल खेळाडूही या विमानातून प्रवास करत होते. स्थानिक स्पर्धेसाठी हे ब्राझीलीयन फुटबॉलपटू कोलंबियाला जात होते.
या अपघातातून काही जण बचावले असावेत असे मीडीलीनचे महापौर फेडरिको यांनी म्हटले आहे. या विमानामध्ये ब्राझीलच्या फुटबॉल क्लबमधील खेळाडूंचा समावेश आहे.
कोलंबियनवेळेनुसार मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मदत आणि बचावपथक घटनास्थळी निघाले असून अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. बोलिव्हीया येथून हे विमान निघाले होते अशी माहिती मीडीलीन विमानतळ अधिका-यांनी दिली. दक्षिण ब्राझीलमधील स्थानिक फुटबॉल क्लबचे खेळाडू कोपा सुदामेरीका स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी कोलंबियाला येत होते. बुधवारी त्यांचा अंतिम सामना होणार होता.
