विरुद्ध दिशेने जाणार्या दोन रेल्वेत टक्कर होऊन तेहरानजवळ झालेल्या भीषण अपघातात ४४ जण मृत्युमुखी पडले तर १0३ जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी उशिरा घडला. रुळावरून घसरलेल्या चार बोगींपैकी दोन बोगीं आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
