एअरटेलची पहिली पेमेंट बँक, देणार ७.२५ टक्के व्याज

एअरटेल या दूरसंचार कंपनीने देशातील पहिल्या पेमेंट बॅंकेची सुरूवात राजस्थानातून केली आहे. एप्रिल २०१६ मध्ये रिझर्व बॅंक इंडियाने एअरटेल पेमेंट बॅंकला अधिकृतरित्या परवाना दिला आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेलने आपल्या पेमेंट बॅंक खातेदारांना ७.२५ टक्के व्याजाची ऑफर दिली आहे .परंतु भारतातील बहुतेक बॅंका या फक्त ४ टक्के व्याज देतात. देशात अशाप्रकारची सेवा देणारी एअरटेल ही पहिली कंपनी आहे.

एअरटेलने सांगितलेल्याप्रमाणे, एअरटेल पेमेंट बॅंक ही भारती एअरटेलची सहाय्यक कंपनी आहे. राजस्थानातील छोट्या गावातील आणि शहरातील ग्राहक एअरटेल पेमेंट बॅंक खाते रिटेलर आऊटलेट्सवर जाऊन सुरू करू शकतात. आणि त्यांचा एअरटेल मोबाईल क्रमांकचं त्याचा बॅंकखाते क्रमांक असणार आहे. ही बॅंक पूर्णतः डिजिटल आणि पेपरलेस असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *