प्रेमाचे नाटक करुन फसवणारा प्रियकर एका तरुणीला बँकेच्या रांगेत सापडला. मग काय, पाच वर्षांपूर्वी तीव्र वेदना देऊन गेलेल्या तिच्या या बेवफा प्रियकरला तिने कुटुंबीयांच्या मदतीने चांगलेच सर्वांसमोर हाणले. ही घटना आहे नाशिकमधील सातपूर परिसरातील.
नोटाबंदीमुळे एका बँकाबाहेर हा तरुण रांगेत उभा होता. त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसलेली एक तरुणीदेखील नेमकी त्या ठिकाणी आली. पाच वर्षांपूर्वी प्रेमाच्या खोटी शपथ घेऊन फसवणूक करणा-या प्रियकर धडा शिकवायचे तिने ठरवले. मग काय,
प्रेमात धोका पत्करलेल्या या तरुणीने त्याला पाहताच कुटुंबीयांना फोन केला. यानंतर तिचे कुटुंबीय तात्कळ तिने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले.
आपल्या मुलीला फसवून पळ काढणा-या तरुणाबाबत त्यांच्या मनात प्रचंड राग साठलेला होता. हाच राग व्यक्त करत त्यांनी त्या तरुणाला बेदम चोप दिला. हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांकडेही धाव घेतली.
