आता दुकाने, मॉल्समध्येही मिळणार कॅश

पेट्रोल पंपावरील स्वाइप मशीनमधून दोन हजारापर्यंत रक्कम काढण्याची  सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर आजपासून दुकाने, मोठया मॉल्समध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.   ज्या दुकानांमध्ये मॉल्समध्ये स्वाइपमशीन्स उपलब्ध आहेत तिथून नागरीकांना डेबिड कार्डवापरुन दोन हजारापर्यंत रक्कम काढता येईल.
३० डिसेंबरपर्यंत त्यावर कोणताही ट्रान्जॅक्शन चार्ज लागू होणार नाही. ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर सध्या बाजारात मोठया प्रमाणावर चलन तुटवडा निर्माण झाला आहे.
त्यावर मात करण्यासाठी आरबीआयकडून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. दुकान, मॉल्समधून रक्कम काढण्याचा पर्याय हा त्याच उपायोजनांचा एक भाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *