भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

चार मजली इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भिवंडीतील गोकुळ नगर परिसरातील समता सोसायटीमधली ही घटना आहे. सूर्यराव ही 40 वर्ष जुनी इमारत कोसळून ही दुर्घटना घडली.
गुरुवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर फायर ब्रिगेड आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. यानंतर फायर ब्रिगेडने ढिगा-याखालून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला.
सूर्यराव इमारतीचा काही भाग शेजारी असणा-या इमारतीवरही पडला. यामुळे खबरदारी म्हणून तेथील कुटुंबांनाही घर रिकामी करण्यासाठी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *