.. आणि रागावलेल्या त्या तरूणीने काढून फेकला कुर्ता

रोख रकमेच्या तुटवड्यामुळे एटीएमच्या रांगेत उभं राहून वैतागलेल्या तरूणीने निषेधार्थ अंगावरचा कुर्ताच काढून फेकल्याची घटना राजधानी दिल्लीतील मयूर विहारमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरूणी पैसे काढण्यासाठी दिल्लीतील मयूर विहार फेज -३ येथील एका एटीएमच्या रांगेत उभी होती. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही रांग पुढे न सरकल्याने ती तरूणी वैतागली आणि तिने भर बाजारात अचानक कुर्ता काढून टाकला. या घटनेमुळे आजूबाजूचे लोक अवाक झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले व एका महिला पोलिस कर्मचा-याने तिच्या अंगावर पुन्हा कुर्ता चढवला. त्यानंतर त्यांनी तिला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन समज देण्यात आली. पोलिसांनी नंतर तिला पुन्हा एटीएममध्ये घेऊन गेले व पैसे काढून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *