आता, एसटीमध्येही मिळणार वाय-फाय!

‘लाल डब्बा’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाची एसटीनं आता कात टाकण्याचं ठरवलंय.

या एसटीमध्ये आता चक्क वाय – फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सेवा मोफत आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या पुणे विभागात सध्या प्रायोगिक तत्वावर वाय-फाय सुविधा देण्यात आलीय.

सध्या एसटीच्या ५० गाड्यामध्ये वाय – फाय सुविधा सुरु करण्यात आलीय. ती यशस्वी झाल्यानं लवकरच ३५० गाड्यांमध्ये वाय – फाय सुरु करण्यात येईल.

डिसेंबरनंतर एसटीच्या इतर विभागातील गाड्यांमध्ये देखील वाय – फाय सुविधा दिली जाणार असल्याचं पुणे परिवहन विभागाकडून सांगण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *