टोलनाक्यांवर नागरिकांच्या रांगाच रांगा

मोदी सरकारनं घेतलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं मोठे परिणाम बघयाला मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी रोखीचे व्यवहार होतायत त्या ठिकाणी लोकांची मोठी अडचण झालीय.

याचा सगळ्यात मोठा परिणाम टोल नाक्यांवर बघयाला मिळतोय. राज्यातल्या बहुतांश टोल युक्त रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, पुणे- सोलापूर रस्त्यावर इंदापूर टोलनाका अशा राज्यातल्या जवळपास सगळ्याच नाक्यांवर एकतर कोंडी बघयाला मिळतेय, किंवा गाड्यांना टोल न घेताच गाड्या सोडण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *