सावजी ढोलकिया 300 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला घेऊन पिकनिकला

दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना 400 घरं आणि 1260 कार देणारे गुजरातचे हिरा व्यापारी सावजी ढोलकियांनी कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट दिलं आहे. ढोलकिया त्याचे 300 कर्मचाऱ्यांना  आणि कर्मचाऱ्यांच्याकुटुंब अशा एकूण 1200 जणांना घेऊन उत्तराखंडमध्ये दहा दिवसांच्या पिकनिकला गेले आहेत.
ढोलकिया हे श्री रामकृष्ण एक्सपोर्ट या हिऱ्यांच्या कंपनीचे मालक आहेत. ढोलकिया यांनी कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची सुट्टी दिली आहे. या पिकनिकसाठी त्यांनी 90 लाख रुपये खर्च करून एक स्पेशल एसी ट्रेनच बूक केली आहे.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही पिकनिकला जात आहे. ढोलकिया हे आम्हाला आमच्या कुटुंबातलेच असल्यासारखी वागणूक देतात, अशी प्रतिक्रिया एका कर्मचाऱ्यानं दिली आहे. उत्तराखंडमध्ये पिकनिकबरोबरच हेकर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनी ऋषिकेशमधला स्वर्गाश्रम या भागात स्वच्छता अभियानही राबवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *