एसटीने एका दिवसात कमावले एक कोटी दोन लाख रुपये

एसटीने एका दिवसात कमावले एक कोटी दोन लाख रुपये

धुळे एसटी विभागाला यंदाच्या दिवाळीत सुगीचे दिवस आलेत. धुळे विभागाने एकाच दिवशी तब्बल एक कोटी दोन लाख रुपये कमविण्याचा विक्रम केला आहे.विभागाला रविवारी एकाच दिवशी हे उत्त्पन्न मिळालंय.

सांगली जिल्ह्याने राज्यात एक कोटी पाच लाख रुपये कमावून पहिला क्रमांक पटकावलाय. तर धुळे विभागाने एकाची दिवशी कोटींचं उड्डाण घेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

गेल्या वर्षी धुळे विभागाने ९३ लाखापर्यंत मजल मारली होती. यंदा मात्र कोटींचा पल्ला ओलांडत नवा विक्रम प्रस्थिपित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नाहीत त्यामुळे हा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *