महिला शिक्षिकांनीच केले पाचवर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण

नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणा-या एका पाचवर्षीय मुलीचे शाळेमधल्याच दोन महिला शिक्षिकांनी लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक प्रकरण पाटण्यामध्ये समोर आले आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार याप्रकरणी गुरुवारी रात्री एफआयआर दाखल झाला असून, मुलीच्या पालकांनी शाळेतल्या दोन महिला शिक्षिकांवर गंभीर आरोप केले आहेत.
मुलीबरोबर अनैसर्गिक कृत्य करुन तिला मारहाण केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. मुलीचे वडिल सरकारी अधिकारी आहेत. दिवाळीच्या सुट्टया सुरु होण्याआधी २७ ऑक्टोंबरला पीडित मुलगी शेवटची शाळेत गेली होती. पीडित मुलगी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होती.
दिवाळीच्या दिवसांमध्ये मुलगी घाबरलेली होती. घरातल्यांशी काही बोलत नव्हती. ३१ ऑक्टोंबरला मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. आई-वडिल मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेले त्यावेळी मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मुलीच्या शरीरातील अंतर्गत भागांवर जखमा होत्या. मुलगी इतकी भेदरलेली होती की, ती कोणाचे नाव घेत नव्हती अखेर फोटोंवरुन तिने आरोपींची ओळख पटवली. ७५ वर्षीय जुन्या शाळेने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *