औरंगाबादमध्ये आज बहुजन क्रांती मूक मोर्चा

औरंगाबादमध्ये आज बहुजन क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मूक मोर्चाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

ऍट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ऍट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा’, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे. सकाळी ११ वाजता क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून मूक मोर्चे काढले जात आहेत. मराठा समाजाला आरक्षण, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल आणि कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आल्यानंतर आता मुंबईत मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ नोव्हेंबरला हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

मराठा समाजाकडून काढण्यात आलेल्या मोर्चांमधून वारंवार ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी होते आहे. तर बहुजन समाजाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चातून ऍट्रॉसिटी कायदा अधिक कठोर काढण्याची मागणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *