सीताफळ खाण्याचे अनेक फायदे

सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत.  सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे.

काळे, घनदाट केस कोणाला आवडत नाहीत. मात्र हल्ली धावपळीच्या जीवनात मात्र केसांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कलपणा या समस्या वाढतात. हल्ली जगातील अनेक जण केसांशी संबंधित समस्याने त्रस्त आहेत. यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे सीताफळ. या फळाच्या सेवनाने अनेक फायदे होतात.

केस गळण्याचे प्रमाण अधिक असेल तर सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधात उगाळून लावा. नवीन केस उगवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *