येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. शिवाय कोकणाच्या बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही  पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रमध्ये दाखल झालेल्या पावसाची आता दिल्लीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पुढच्या दोन दिवसात मान्सून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर दाखल होईल. शिवाय मान्सून दिल्लीपर्यंत पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

उद्या कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *